Surprise Me!

Shivsena नेत्यावर भरचौकात वार...छत्रपती संभाजीनगरमधली धक्कादायक घटना... Ambadas Mhaske | Crime

2026-05-26 5 Dailymotion

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंबादास मसके यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या स्टाईलने झाल्याचे समोर आले आहे.
आरोपी राम बोडके याने गळाभेट घेण्याच्या बहाण्याने मसके यांना जवळ ओढून त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. रविवारी रात्री उशिरा बाबा पेट्रोल पंप चौकात ही थरारक घटना घडली.
या हल्ल्यात अंबादास मसके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा मुख्य आरोपी राम बोडके हा परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
क्रांती चौक पोलीस ठाण्यात आरोपी राम बोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांची विविध पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
#AmbadasMaske #ShivSena #ChhatrapatiSambhajinagar #Attack #CrimeNews #MulshiPattern #RamBodke #MaharashtraNews #LokmatNews #Breaking

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat